शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

व्यापा-याला लुटणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:14 PM

व्यापारी मुकेशलाल काबरा यांना अडवून गळ्यातील एक लाखांची सोन्याची साखळी लुटून नेणाºया दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

 जालना : येथील व्यापारी मुकेशलाल काबरा यांना अडवून गळ्यातील एक लाखांची सोन्याची साखळी लुटून नेणाºया दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कृष्णा भिकूलाल पवार व परमेश्वर भाऊराव अंभोरे (रा. ढवळेश्वर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे, असून ते पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. मुकेश काबरा हे १९ सप्टेंबर हे रात्री नऊच्या सुमारास स्कूटीवरून मोलकरणीस सोडण्यास जात असताना, दोघांनी दुचाकी आडवी लावून त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून जवळच्या पांजरपोळ जंगलात नेले. काबरा यांच्या गळ्यातील एक लाखांची सोन्याची चेन काढून घेतली. हा प्रकार कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.तपासादरम्यान, वरील दोघांनीच हा गुन्हा केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ढवळेश्वर परिसरातून गुरुवारी रात्री उचलले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच काबरा यांची चेन परभणी येथे एका दुकानात विक्री केल्याचे सांगितले. दोघेही चार वर्षे मोक्कांतर्गत न्यायालयीन कोठडीत होते. दीड वर्षांपासून ते जामिनावर बाहेर होते. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, भालचंद्र गिरी, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, विलास चेके, वसंता राठोड, महिला कर्मचारी शमशादबी पठाण, बनसोडे यांनी ही कारवाई केली.