शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:56 IST

जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. भाऊसाहेब सदाशिव जोगस (५२, ह.मु. सर्वे नं. ४१ मुकुंदनगर मारोती मंदिराजवळ, औरंगाबाद), सुरेश गंगाराम गंगासागरे (५७, ह.मु. फायर स्टेशन कॉलनी, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारदार हे फायर सेप्टी अ‍ॅण्ड सर्व्हिसचे काम करतात. तक्रारदारांनी शहरातील हॉस्पिटल व हॉटेलचे अग्निशमन यंत्र बसवलेले आहे. या अग्निशमन यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाही. यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सदरचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी तक्रारदारांनी २१ मे रोजी अग्निशमन अधिकारी गंगासागरे यांची भेट घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. मात्र, अग्निशमन अधिकारी गंगासागरे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्यानंतर तक्रारदारांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. सदर तक्रारीवरुन २१ मे रोजी अग्निशमन अधिकारी गंगासागरे व कार्यालयीन अधीक्षक जोगस यांची पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी तडजोडीअंती ५५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. बुधवारी सापळा रचून अग्निशमक अधिकारी गंगासागरे यांच्या सांगण्यावरुन कार्यालयीन अधीक्षक जोगस यांनी पंचासमक्ष ५,५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एसीबी च्यावतीने सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रवींद्र निकाळजे, पो.नि. व्हि. एल. चव्हाण, पो.नि. काशिद, कर्मचारी धायडे, मनोहर खंडागळे, उत्तम देशमुख यांनी केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकJalana Muncipalityजालना नगरपरिषद