शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:22 IST

गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा लावून पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी, डोमलगाव परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा लावून पकडले.एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहायक फौजदार सय्यद नासिर, पो.कॉ. महेश तोटे, गणेश बुजाडे, गणेश लक्कस आदींच्या पोलीस पथकाने बुधवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान पैठण फाट्यावर पाळत ठेवली असता, पाच-पाच ब्रास अवैध वाळूने भरलेले हायवा क्र. एम.एच.२१.बी.एच.०६०० एम.एच.२१ ए.वाय.५५९६ मिळून आले. तर कुरण-पाथरवाला रस्त्यावर अवैध वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले.पो.कॉ. गणेश लक्कस यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक सलीम इसाक शहा (रा. औरंगाबाद), संतोष विठ्ठल मुळे (रा. अंबड), ट्रॅक्टर चालक विजय भगवान सातपुते, दिगंबर शाहूराव थोरात (रा. दोन्ही कुरण ता.अंबड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहने जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावण्यात आली आहेत.अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडलेलोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : गोदावरी पात्रातून चोरी वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार चंद्रकात शेळके यांच्या पथकाने बुधवारी सकाळी पकडल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.रामसगाव येथून गोदावरी पात्रातून अवैधपणे वाळूची चोरी करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकात शेळके यांच्या पथकाला मिळाली होती. यामुळे मंडळ अधिकारी एस. टी. साळवे, तलाठी आर. वाय. शेख, एन. व्ही. सोनवणे, बी. व्ही. चौरे यांनी रामसगाव परिसरात सापळा लावून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर एक मोटार सायकल जप्त करुन तीर्थपुरी येथील पोलीस चौकीत जमा केले. धर्मराज उढाण, आदित्य भालेकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. चालक आणि मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु रात्री होती. जोगलादेवी परिसरातूनही मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक हायवाव्दारे वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी