शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पोलिसाला दगड मारणाऱ्या दोन आरोपींना एक वर्षाची शिक्षा

By दिपक ढोले  | Updated: June 26, 2023 19:49 IST

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले.

जालना : पोलिसाला दगड मारून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी सटवाजी भागडे (रा. भागडे सावरगाव, ह.मु.सेवली, जि. जालना) व लहू पंडित जाधव (रा. वखारी पत्रातांडा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

३ मार्च २०१६ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वाहनाने दोन्ही आरोपींना पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिली होती. पोलिस आरोपींना घेऊन वाहनाकडे जात असताना, दोन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी लहू जाधव याने एका पोलिसाला दगड मारला. तर दुसरा आरोपी शिवाजी भागडे हा गाडी घेऊन पळवून गेला. या प्रकरणी डिंगाबर शामराव राठोड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल डिगांबर राठोड, बहुरे, डॉ. भिवटे, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने साक्षीपुराव्याच्या आधारावरून आरोपी शिवाजी भागडे, लहू जाधव या दोघांना एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. बी. के. खांडेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :PoliceपोलिसJalanaजालनाCourtन्यायालय