लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळा म्हटले की, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतो. विजा चमकताना सहसा मोबाईल बंद करणे गरजेचे असून, झाडाखाली न थांबण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण हे लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की, रानातील गुरेही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक गुरांचे गोठे झाडाखाली असतात.
कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई
n शासनाने नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मनुष्य आणि जनावरांसाठी याआधीच तरतूद केली आहे.
n त्यानुसार वीज पडून मनुष्याचा मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपये, तर जनावरांच्या मालकांना ५० आणि २५ हजार रुपये अनुदान मिळते.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
ज्यावेळी ढगांमध्ये विजांचा कडकडाट होतो, त्यावेळी शक्यतो कुठल्याही झाडाखाली थांबू नये. तसेच मोबाईलचा वापर न केलेलाच चांगला, अशा सूचना आहेत; परंतु याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
कोट
राज्य सरकारने वीजरोधक यंत्रणा बसविण्यासाठी आता विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यास मदत होणार आहे.
- डॉ. संजय लाखे-पाटील, जालना
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?
१. जालना जिल्ह्यात जवळपास १८ वेगवेगळ्या ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
२. आपत्ती निवारण विभागाकडून पावसाळा सुरू झाल्यावर सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात.
३. अनेक वेळा पावसापासून बचावासाठी शेतकरी अथवा गुरे चारणारे हे झाडाखाली उभे राहतात, ते टाळले पाहिजे.