शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:00 IST

जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे.क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या रोगाची लक्षणे असणाºया व्यक्तीचे रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. जनजागृतीमुळे मागील काही वर्षात क्षयरोगाची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अनेकदा हे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेतात. मात्र, केंद्रशासनाने या रुग्णांची नोंद शासनस्तराव ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. फुफुसाचा क्षयरोग असणारे बहुतांश रुग्ण त्रासाकडे दुर्लक्ष करून डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात, असे आढळून आल्यानंतर क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.जिल्ह्यातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून निकषांनुसार निवडलेल्या कार्यक्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. विशेषत: झोपडपट्टी भाग, कारागृह कैदी, अनाथायले, बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, दुर्गम गावे, एचआयव्ही अति जोखमीचा भाग, अती कुपोषित भागांत या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देऊन क्षयरोगांच्या लक्षणांची माहिती देणे, संशास्पद रुग्ण आढळल्यास त्यांच्या थुंकीचे नमुने घेणे तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नवीन क्षयरुग्ण आढळल्यास त्यांच्यावर वर्गवारीनुसार डॉट्स उपचार जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. ए.जी. सोळंके यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना