शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना-अंबड महामार्ग झाडांअभावी बोडखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:41 IST

अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / जामखेड : अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला आहे.आधीच जिल्ह्यात वृक्षाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. गत चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांनी केला आहे. असे असतांना सुध्दा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन संपादीत करून त्यावरील मोठे वृक्ष तोडण्यात येत असल्याने परिसर भकास झाला आहे. एकीकडे शासन वृक्ष अभियान राबवून वृक्ष लागवड करावी, यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून जनजागृती करते. तर दुसरीकडे उभी असलेल्या मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा दुप्पटीपणा दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमीतून तीव्र नाराजीचा सूर आहे.राज्य सरकार एकीकडे 'झाडे लावा' 'झाडे जगवा' असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महाकाय वृक्ष तोडण्यात येत आहे. पर्यावरणाचा विचार करता या मार्गावरील वृक्षाची कत्तल न करता महाकाय वृक्षाचे संगोपन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमीसह परिसरातील नागरिकातून होत आहे.दरम्यान, वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गenvironmentवातावरण