शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

By विजय मुंडे  | Updated: March 4, 2023 18:37 IST

पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे

- विजय मुंडेजालना : शहरातील मोती तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी बोटीद्वारे ट्रॅक्टरभर मृत मासे तलावाबाहेर काढले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

शहरातील मोती तलावात माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला होता. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी नगर पालिकेतील स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाच्या जवानांना मृत मासे पाण्याबाहेर काढण्याबाबत सूचित केले होते. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, शिफ्ट इंचार्ज संदीप दराडे, नागेश घुगे, सागर गडकरी, सादिक सय्यद, रवी तायडे यांच्यासह स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, शोएब खान व १५ कर्मचारी शनिवारी सकाळी मोती तलावावर गेले. मोती तलावातील पाण्यात तरंगणारे मृत मासे बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. जवळपास एक ते दीड ट्रॉली मृत मासे तलावाबाहेर काढून नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तलावात आणखी मृत मासे असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे ते मासेही बाहेर काढून टाकण्याची मागणी होत आहे.

मासे खाणाऱ्यांच्या आरोग्याचे काय ?मोती तलावातील मासे पकडून त्याची विक्री केली जात होती. शिवाय अनेक नागरिक स्वत: तलावाशेजारी बसून मासे पकडून खाण्यासाठी घरी नेत होते. मोती तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने आता त्या तलावातील मासे खाणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

पालिकेने खोदला रस्तामोती तलावात ट्रकसह इतर वाहने धुणाऱ्या वाहन चालकांची संख्या अधिक होती. या वाहनांतील ऑइल, कपडे धुताना गेलेले साबणाचे, पावडरचे घटक यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब पाहता नगर पालिकेने तलावाकडे जाणारा रस्ताही खोदला आहे.

नमुने तपासणीसाठी पाठवले मोती तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबादेतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर माशांचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती समोर येईल.-एस. एम. कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी,प्रदूषण नियंत्रण महामंडळ

पाण्याचे नमुने घेतले मोती तलावातील मृत मासे काढले जात असून, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाईल.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

कारवाई करावी मोती तलावात वाहने धुणे, कपडे धुण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी ऑइलसह इतर घटकांमुळे तलावातील पाणी अशुद्ध होऊन माशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या तलाव परिसरात येणाऱ्या पक्ष्यांची संख्याही घटली आहे. प्रशासनाने माशांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी.- ज्ञानेश्वर गिराम, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीenvironmentपर्यावरणJalanaजालना