शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:40 IST

आता कॅनडा येथे १४ ते २४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघात खेळणार

- राहुल वरशिळजालना : शहरातील तिरंदाज (धनुर्विद्या) तेजल राजेंद्र साळवे हिने सिंगापूर येथे १६ ते २० जूनपर्यंत आयोजित केलेल्या आशिया कप स्टेज दोनमध्ये भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तेजलने भारतीय प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाईसोबत अंतिम सामन्यांत १४६-१४४ असा पराभव करून बाजी मारली आहे. यात भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले असून, सांघिक गटात तेजल साळवे, बुद्धी सन्मुखी व तनिष्का ठोकळ यांनी विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी तेजलने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशीप २०२४ मध्ये रौप्य तर, दक्षिण कोरीया येथे २०१४ मध्ये झालेल्या आशिया कप स्टेज-३ मध्येही रौप्य पदक पटाकवले होते. गोवा येथे झालेल्या थर्टी सेव्हन नॅशनल गेम्समध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिघे सख्खे बहिण-भाऊ तिरंदाजीत तरबेजजालना शहरातील साळवे घराण्यातील तेजलने अनेक पदके पटकावली आहे. तर बहिण प्रांजल साळवे हिनेदेखील राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविले असून, भाऊ आदर्श साळवेही तिरंदाजी स्पर्धेत विभागीय आणि राज्य पातळीवर आपले नशीब अजामावत आहेत. एकाच घरातील तिघेही सख्खे बहिण-भाऊ आर्चरीमध्ये खेळून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करीत आहेत.

रोज आठ तास सराव करून साधले लक्षगेल्या सहा वर्षांपासून सातत्याने धनुर्विद्या प्रकारात खेळत आहे. यापूर्वी अनेक राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय स्तरावर विविध पदके पटकावली आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्ण पटकावले आहे. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी रोज आठ तास सराव करीत आहे. यापुढेही कायम सराव करून देशासाठी खेळत राहणार आहे.- तेजल साळवे, युवा तिरंदाज, जालना.

कॅनडा येथे होणाऱ्या स्पर्धेत अजमावणार नशीबआता सुवर्णकन्या तेजल साळवे १४ ते २४ ऑगस्टदरम्यान कॅनडा येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहे. १७ वर्षीय तेजलने आतापर्यंत आशियाई युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि विविध एनटीपीसी नॅशनल रँकिंग स्पर्धांमध्ये पदक मिळवून तिने आपल्या खेळाची छाप पाडली आहे. त्यामुळे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे झालेल्या निवड प्रक्रियेत भारतीय संघात तिची निवड झाली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाsingaporeसिंगापूर