शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:44 IST

प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण तापवले होते. या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.जालना लोकसभा मतदार संघात कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक लढविणारे रावसाहेब दानवे यांच्या विरूद्ध काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरूनच गेले तीन महिने गोंधळाचे वातावरण होते. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी दानवेंच्या विरूद्ध दोन हात करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसने २०१४ साली दानवेंना टक्कर देणाºया विलास औताडे यांनाच रिंगणात उतरविले. २०१४ मध्ये मोदी लाटेतही औताडे यांना ४ लाख ८५ हजार मते मिळाली होती. यावेळी अशी कुठलीच लाट नसल्याने औताडे हे दानवेंना चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा आहे.वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन वेळेस जालन्यात येऊन गेले. आंबेडकरांप्रमाणेच आ. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अल्पसंख्याक समितीचे हाजी अरफाज, केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम भाईजान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप महिला मोर्चाच्या माधवी नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांनी जालना, भोकरदन, पैठण, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड येथे या नेत्यांनी हजेरी लावून आपल्याच पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करून एकमेकांवर टीकेची झोड उठवून उन्हाळ्यात आणखी राजकीय वातावरण तप्त केले होते.दरम्यान, शनिवारी जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी वेगवेगळ््या प्रकारे संपर्क साधून निवडून देण्याचे आवाहन केले.निवडणूक यंत्रणा सज्जजालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन पूर्णपणे सील करण्यात आल्या असून, त्यांचा सांभाळ हा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत केला जात आहे. या निवडणुकीत जवळपास ८ हजार कर्मचारी लागणार असून, दोन हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येत आहे. - राजीव नंदकर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालना