शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरून बोरगावात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथे शेतवस्ती रस्त्यावरून दोन गटात हाणामारी होऊन या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोबरे,पोहेका भगत राजपूत, डी.आर काहळे, संगीता अशोक फदाट हे जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथे शेतवस्ती रस्त्यावरून दोन गटात हाणामारी होऊन या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोबरे,पोहेका भगत राजपूत, डी.आर काहळे, संगीता अशोक फदाट हे जखमी झाले आहे. जखमी पोलिसांना जालना सामान्य रुग्णालयात उपचारा साठी दखल करण्यात आले.गावा पासून शेतवस्तीकडे जाणार रस्त्याविषयी शेतमालक व काही ग्रामस्त यांच्यात वाद होऊन या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तरी देखील रविवारी सकाळी रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊन नियमानुसार काम करण्या करता शेतमालक यांनी सुरुवात केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. व जखमी करण्यात आले. रस्त्याचे काम थांबवत नाही म्हणून नंदाबाई प्रकाश फदाट यांनी विष प्रशासन केले आहे. त्यांना सुद्धा जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. झालेल्या मारहाण प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या साठी फदाट कुटूंब गेले असता रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीविषयी जवाब येताच फिर्यादीची तक्रार दाखल करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.रविवारी रस्त्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद महिलेने विष प्राशन केल्याने विकोपला पोहोचला. भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याने वाातावरण संतप्त झाले होते, पोलीसांनी संयम दाखवत तेथे बळाचा वापर केला नाही. दोन गटातील या वादाचे पडसाद संपूर्ण गावावर पडले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे समर्थक आपापसात चर्चा करताना दिसून आले.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे