शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी संजीवनी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:36 IST

राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील ४ हजार १४२ गावात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवित असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील ४ हजार १४२ गावात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवित असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. या माध्यमातून शेतक-यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यशाळेत ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी जवळपास ४ हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहे. राज्य शासनाचा १ हजार २०० कोटी रुपयांचा यामध्ये हिस्सा असणार आहे. जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६७ गावांची निवड झाली आहे. आता २८१ गावांची निवड हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतक-यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यशाळेस जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जि. प. सदस्य राहूल लोणीकर, रामेश्वर भांदरगे, जिल्हा कृषी अधिकारी माईनकर, कोयले, कोकाटे, पंडित भुतेकर, पंजाब बोराडे, मधुकर खंदारे, पांडुरंग डोंगरे, गणेश खवणे, रमेश महाराज वाघ, कल्याण खरात, बी. डी. पवार, शिवदास हनवते, प्रकाश टाकले, निवृत्ती डाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.९४८ कोटींचे पीककर्ज वाटपजिल्ह्यातील शेतक-यांना ९४८ कोटी ११ लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री लोणीकर यांनी दिली. सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये वर्ष सन २०१५-१६ मध्ये २१२ गावे, सन २०१६-१७ मध्ये १८६ गावे, सन २०१७-१८ मध्ये १४९ गावे, सन २०१८-१९ मध्ये २०१६ गावे अशा आतापर्यंत एकूण ७५३ गावांची निवड करण्यात आलेली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर