जालना : जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून सलग दोन दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकाने सहा वाळूची वाहने पकडली आहेत. शनिवारी दुपारी बदनापूर तालुक्यातील सोमठाणा ते हसनाबाद मार्गावर पथकप्रमुख एम.वाय.दांडगे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी अमोल पाटील, सुहास देशमुख, शिंदे यांनी अचानक पाहणी करून पोलिसांच्या मदतीने तीन वाळूचे टिप्पर पकडले. गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास १५ लाख रूपयांची अवैध वाळू वाहतूक पकडण्यात आल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वाळू वाहतूक करणारी तीन वाहने केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:52 IST