शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाची अवैध वाहतूक केल्या प्रकरणात तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:03 IST

भोकरदन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा गहू पकडला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा गहू पकडला असून, या प्रकरणात गहू मालक, ट्रक मालकासह चालकाविरूध्द सोमवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नव्हता.सिल्लोड- भोकरदन मार्गावरील नांजा पाटीजवळ रविवारी मध्यरात्री भोकरदन पोलिसांनी एका ट्रकवर (क्र.एम.एच.१५- सी. के. २३८९) कारवाई केली होती. यावेळी स्वस्त धान्य दुकानातील २ लाख ६६ हजार २५० रूपये किंमतीचा ३५५ पोती गहू जप्त करण्यात आला होता. ट्रकसह १२ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोनि दशरथ चौधरी यांच्या तक्रारीवरून गहू मालक, ट्रक मालकासह चालकाविरूध्द सोमवारी पहाटे जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी असलेला चालक फरार झाला कसा आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत एकाही आरोपीचा पत्ता पोलिसांना लागला नाही कसा ? असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये, पोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बी़बी़ वडदे हे करीत आहेत.गहू जळगावमधील असल्याची चर्चाभोकरदन पोलिसांनी पकडलेली गव्हाची ट्रक ही जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गहू जर चोपडा येथील असेल तर ट्रकमधून तो गहू भोकरदन परिसरात आला कसा ? त्याची जालना किंवा इतर ठिकाणच्या काळ्या बजारात विक्री होणार होती का ? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पुरवठा अधिकाऱ्यांकडून पाहणीभोकरदन पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील गव्हाच्या ट्रकवर कारवाई केल्याने पुरवठा विभागातही खळबळ उडाली आहे. पुरवठा विभागाच्या वतीने आपापल्या गोडाऊनमधील माल सुरक्षित आहे का याची चाचपणी करण्यात आली. सहायक पुरवठा अधिकारी उघडे व त्यांच्या पथकाने भोकरदन येथील गोडाऊनलाही भेट देऊन तपासणी केली. मात्र, केवळ माल पकडला तरच पुरवठा विभाग गोडाऊनची तपासणी कशी काय करते ? हाच प्रश्न आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी