शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तीन सावकारांच्या घरे, दुकानांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:44 IST

अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी धाडी मारल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी धाडी मारल्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी अंबड तालुक्यातील सुखापुरी, रेवलगाव येथे करण्यात आल्या. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर लाखो रूपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती लागली आहेत.अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील एकाने तीन सावकारांविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पाच पथके तयार केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी या पथकांनी रेवलगाव येथील सरुबाई विश्वनाथ भोंडवे यांच्या घरी, सुखापुरी येथील काकासाहेब तुळशीदास राखुंडे यांच्या घरी, दुकाने, सुखापुरी येथीलच रामदास चोखाजी पटेकर यांच्या घरी धाड टाकली. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर लाखो रूपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे सापडली आहेत.ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले. कारवाईत सहभागी झालेल्या पथकात अंबडचे सहायक निबंधक परेश बेरा, जालन्याचे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे, घनसावंगीचे सहायक निबंधक अजय भिल्लारे, परतूरचे सहायक निबंधक प्रणव वाघमारे, भोकरदनचे सहायक निबंधक श्रीराम सोनने यांचा सहभाग होता.चार टीम : ३८ जणांचा सहभागअंबड तालुक्यातील रेवलगाव, सुखापुरी येथे पाच पथकांनी कारवाई केली. यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत २० अधिकारी- कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी व ८ पंच असे एकूण ३८ जणांचा या पथकात सहभाग होता.लाखोंचा व्यवहारजिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली आहेत. यात लाखो, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :raidधाडRevenue Departmentमहसूल विभाग