शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:18 IST

मनोज जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

- पवन पवारवडीगोद्री( जालना) : ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही, त्यांच्यावर काय बोलावं, असा टोला मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना लगावला.अंतरवाली सराटी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

जरांगे पुढे म्हणाले, मराठे फक्त हक्क मागत आहेत. तुमचा मित्र त्याला तुम्ही रोज भेटता, सागर बंगल्यावर जाऊन. त्याने मराठ्याचे, ओबीसी नेते विरोधात घातले. तो डोके भडकवत आहे, त्याला थोडा सांगा. मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू, असा सणसणीत टोला जरांगे यांनी राज ठाकरे यांना लगावला. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही जातीच्या मुद्द्यांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असे, राज ठाकरेनी सोलापूर मध्ये वक्तव्य केले होते. 

नारायण राणे यांना सुनावलेअंतरवाली सराटीतील अनेक महिलांना गोळ्या लागल्या अजूनही त्या काठ्यावर चालतात. ते नाही दिसत का ९६ कुळी क्षत्रिय मराठ्याला. त्यांना देवेंद्र फडणवीसच दिसतो. तो २५ पोळ्या खातो दुधात चुरून. मी गोर गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो अन् तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणून लढता, अशी खरमरीत टीका जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे यांच्यावर केली. 

ईडबल्यूएस रद्द करण्यास कोणी सांगितलेईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये मुस्लिमांचा फायदा होत आहे हे यांचं दुखणं असून मी कधी म्हणलो मराठ्यांच ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करा. एसईबीसी दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात कुठेही गुलाल उधळला नाही. दहा टक्के आरक्षण मराठ्यांना मान्य नाही. ईडबल्यूएस रद्द करून मराठ्यांच सरकारने वाटोळ केल, असा आरोपही जरांगे यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे Raj Thackerayराज ठाकरे