शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संशयित आरोपींचे पोलिसांकडून स्केच जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:45 IST

सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे रेखाचित्र सोमवारी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे रेखाचित्र सोमवारी जाहीर केले.जालना शहरातील विनय बाफना यांचे राजूर येथे सोन्याचे दुकान असून, ते त्यांचा मुलगा नवनीत यांच्यासह जालना येथून राजूरला नियमित ये-जा करतात. या ठिकाणी त्यांची सोन्या - चांदीची दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दुकान बंद करुन ते जालन्याकडे येत होते. या दरम्यान त्यांनी राजूर येथील चौफुली सोडल्यानंतर त्यांच्या कारच्या समोरुन एक तर मागच्या बाजूने एक अशा दोन कारने त्यांच्यावर पाळत ठेवली. या तिन्ही कार जवळपास वीस किमी अंतरावर आल्यानंतर घाणेवाडी फाट्याच्या शिवारातील फुलावर समोरील कारने ब्रेक लावले, तर मागच्या कारने बाफना यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली.यावेळी स्कोडा कारमधील तीन ते चार जणांनी हातात तलवार तसेच बंदुक घेऊ विनय बाफना यांना गाडीतील ऐवज देण्याची मागणी केली. त्यांनी विरोध केल्यानंतर विनय बाफना यांच्या हातावर तलवारीने वार केले तर मुलगा नवनीत यालाही जखमी केले.यावेळी बाफना यांच्या कारच्या काचा फोडून दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना या दरोडेखारांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी आता चार संशयितांचे स्केच जाहीर केले आहे.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस