शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:50 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा, रेकॉर्ड अद्यावत न करणे, उशिरा येणे, महिन्याभरापासून गैरहजर राहणे या सर्व बाबी आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा या सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. कामात हलगर्जीपणा, सतत गैरहजर राहणे व रेकॉर्ड मेन्टेन न करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उचला आहे. यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच आठ अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. हे पथक दर आठवड्याला जिल्हाभरातील जि. प. शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींचा कारभार, रोजगार हमीची कामे, या सर्व बाबी तपासत आहे. या पथकाने आतापर्यंत १३८ ग्रामसेवक, १२ वैद्यकिय अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दरम्यान, या पथकानेच जिल्हाभरातील काही शाळांची पाहणी केली असता, काही शाळांमध्ये अस्वच्छता, पोषण आहार गॅस ऐवजी लाकडाने शिजवणे, गैरहजर असणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. यात १ केंद्रपमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. यापुढेही अशा कामचुकार कर्मचा-यांवर जास्तीचे लक्ष ठेवण्यात येणार आहे.कुठे काय आढळले ?घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील अर्जुननगर शाळेत शिक्षक उशारा आल्यामुळे त्यांची तात्पुरती वेतनवाढ बंद करण्यात आली आहे.परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शाळेत शालेय पोषण आहार योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी न करणे, रेकॉर्ड अद्ययावत न करणे.परतूर तालुक्यातीलच वाटूर केंद्राचे केंद्रप्रमुख मागील महिन्याभरापासून गैरहजर असल्याचे आढळून आले.जाफराबाद तालुक्यातील शिरोळा येथील मुख्याध्यापकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी लाकडाचा उपयोग केला. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीgovernment schemeसरकारी योजना