शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनाला गेलेल्या व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:58 IST

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या एका भाविकाचे घर चोरट्याने फोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या एका भाविकाचे घर चोरट्याने फोडले. ही घटना परतूर येथील रेणुकानगर भागात बुधवारी रात्री घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परतूर शहरातील रेणुकानगर भागात राहणारे सिध्देश्वर अंजीराम बिल्हारे हे बुधवारी रात्री घराला कुलूप लावून निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचा पत्रा उचकटून आतील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ६६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.बिल्हारे हे कीर्तन संपल्यानंतर घरी आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सिध्देश्वर बिल्हारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि माने हे करीत आहेत. दरम्यान, चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.दुचाकीवर विदेशी दारूची वाहतूक; दोघाविरूद्ध गुन्हालोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुचाकीवरून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाºया दोघांविरूध्द सदरबाजार पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, यावेळी ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरूवारी दुपारी प्रकाश हॉटेलसमोर दुचाकी (क्र.एम.एच. २१- बी.ए.९१००) थांबवून चौकशी केली. त्यावेळी दुचाकीवरील दोघांकडे ३४ हजार २५० रूपयांची विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी पोकॉ मनोज काळे यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात किशोर उत्तमराव बनकर, गजेंद्र भगवानराव बंगड या दोघांविरूध्द तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी