शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजाटाकळीत नऊ ठिकाणी चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:55 IST

नसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.राजाटाकळी गावातील ज्ञानेश्वर आजेबा आर्द्रड यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोट्यांनी तीन तोळे सोने चोरी केले, गावातीलच रमेश मुदडा यांच्या किराणा दुकानचे शटर फोडून ११ हजार रोख रक्कम लंपास केली. तर सुधाकर आर्द्रड यांचे दुकान फोडून तीन हजार रोख, दत्तात्रय आर्द्रड यांच्या दुकानाचे शटर फोडून चार हजार रोख तर गावातीलच जिगना पठाण, हनुमंत आर्द्रड, रामकिशन आर्द्रड यांच्यासह आजूबाजूला असलेल्या पाच ते सहा बंद घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पो. हेकॉ. मधुकर बिक्कड यांनी घटनास्थळी पाहाणी करुन पंचनामा केला.गावात मागील महिन्यात झालेल्या पाच चो-यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, या चो-याचा तपास लवकरात लवकर लावण्यात येणार असल्याचे सांगितले.राजुरात चोरट्यांनी किराणा दुकान फोडलेराजूर : येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात रोख रकमेसह पंधरा हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.येथील राजूरेश्वर मंदिराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर मुकेश अग्रवाल यांचे गणेश किराणा दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील शटर उचकटून आत प्रवेश करून रोख चार हजार रूपये, सिगारेट पाकिटे व तेलाचे डबे असा पंधरा हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. मुकेश अग्रवाल यांनी मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती राजूर पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि. किरण बिडवे, सहायक फौजदार एकनाथ पडूळ, विष्णू बुनगे, प्रशांत लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भरचौकात चोरी झाल्याने व्यापाºयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर दुकानात यापुर्वी सुध्दा चोºया झालेल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी व्यापा-यांंतून होत आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत राजूर पोलिसांत गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस