शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:57 IST

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागातील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. घाणेवाडी येथील जलाशयातील पाणी या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून, येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला होता. त्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी योजनेद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या पावसामुळे घाणेवाडी जलाशय तुडुंब भरला आहे. परंतु, वर्षभरापासून घाणेवाडीची जलवाहिनी बंद होती. त्यामुळे नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद पडले होते. या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम जालना पालिकेतर्फे सुरु करण्यात आले असून, पाणी शुध्दीकरणासाठी लागणारा ब्लिचिंग पावडरचा साठा मागवण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी विद्यमान आ. कैलास गोरंट्याल यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जलशुध्दीकरण केंद्राचे काम झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठवड्यापासून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेने केले ४८ एमएलडी पाण्याचे नियोजनअंबड येथे जायकवाडी- जालना योजनेच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले २४ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी शहागड- जालना या योजनेदरम्यान कार्यान्वित करण्यात आलेले १५ एमएलडी क्षमतेच्या नादुरुस्त असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या माध्यमातून जालना शहराला पाणीटंचाईच्या कालावधीत एकूण ४८ एमएलडी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन जालना पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत ६ एमएलडी आणि अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत १८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषद