शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:55 IST

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत.

जालना : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही राज्यातील जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी गुरुवारी जालन्यातील मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावे घेतले जात आहेत. त्यापुढे आम्ही शिवसंवाद यात्रा दोन काढून जनतेशी संवाद साधणार आहोत. आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते येत आहेत. दोन वेगळे पक्ष झाले. जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आजही नैतिकतेला महत्त्व देणारी लोक आहेत. त्यामुळे असे लोक असेपर्यंत चिंता नाही, असेही पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढविणार असून, आमच्यात चर्चा झाल्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे आज सांगता येणार नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या १७५ हून अधिक जागा येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही आंदोलकांना सरकारनेच आश्वासन दिलेशरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणावर आम्ही आमची भूमिका पूर्वीच मांडली आहे. विरोधकांना विकास कामांवेळी विश्वासात घेतलं जात नाही. निधी वाटपावेळी विश्वासात घेतलं जात नाही. त्यात आता मराठा आंदोलक, ओबीसी आंदोलकांशी शासनाने चर्चा करून आश्वासन दिलं आहे. समाजाशी चर्चा करताना, आश्वासन देण्यापूर्वी विरोधकांना विश्वासात घेणे अपेक्षित होतं. सरकारने जे आश्वासन दिले त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली असून, तो निर्णय वेळेत घ्यावा, असे पाटील म्हणाले.

मोठ्या नेत्यांनी आव्हान; प्रतिआव्हानांपासून दूर रहावेएखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याला त्यातून सोडविण्याचे आश्वासन देणे हे अतिशय गंभीर आहे. त्यात आता अनिल देशमुख यांच्यावर कोणत्या तरी अधिकाऱ्याला बोलून आरोप करायला लावले जात आहेत. या जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा, विरोधी पक्षाची माप काढण्यापेक्षा आम्ही विकास कसा करणार, पुढे काय करणार हे सरकारने जनतेला सांगावे. राजकारणात आव्हान आणि प्रति आव्हानांपासून मोठ्या नेत्यांनी दूर रहावे, असा सल्ला पाटील यांनी फडणवीस यांना दिला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना