शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

चोरी प्रकरणातील मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:50 AM

गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे. मात्र दागिने चोरणारी महिला अद्यापही फरार असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.कर्नाटकातील मल्लेश्वरम (बंगळुरू) येथील मंजुदेवी सिंघवी (४३) जानेवारी महिन्यात जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुगणेशलाल महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी समाधीचे दर्शन घेत असताना त्यांची पर्स चोरी गेली होती. या पर्समध्ये ७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये होते. या प्रकरणी १८ जानेवारी रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरु गणेश भवन मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला मंजुदेवी यांनी दर्शन करताना बाजूला ठेवलेली पर्स उचलून घेऊन घाईगडबडीने एका कारमधून निघून जात असल्याचे पडताळणीतून निष्पन्न झाले. सदर बाजार पोलिसांनी मिळालेल्या माहिती तपास करुन शहरातील एका घरासमोर लावलेली कार (एमएच-२१, एएक्स- १२२२) जप्त केली. मात्र सदर महिला अद्यापही फरार असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.पर्स चोरी करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. सदर महिलेने चोरलेला मुद्देमाल गणेश भवन येथील दानपेटीत टाकल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. सदर बाजार पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :theftचोरीjewelleryदागिनेCrime Newsगुन्हेगारी