शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न

By शिवाजी कदम | Updated: January 2, 2024 19:12 IST

कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती

- पवन पवारवडीगोद्री : अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने अवघ्या २५ गुंठ्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. अजय राऊत या कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणाने कमी शेतीतदेखील जास्त उत्पन्न घेता येते हे शक्य करून दाखविले आहे.

शेती हा तोट्यात चालणारा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते. परंतु, सौंदलगाव येथील अजय राऊत यांनी कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अजय राऊत यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:ची शेती फुलवण्याचा निर्णय घेतला.

सहा हजार रोपांची लागवडअजय राऊत यांना दोन एकर शेती आहे. दोन भाऊ, आई, भावजय हे शेतात राहतात. यावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. या दोन एकर शेतात पारंपरिक पद्धतीने उत्पन्न मिळत नसल्याने अजय राऊत यांनी दोन एकरांमधील २५ गुंठे शेतीत शेवंतीचे सेंट व्हाईट व पौर्णिमा व्हाईट या फुलांची सहा हजार रोपे लावली. त्यांना रोपांसाठी १२ हजारांचा खर्च आला. जुलैमध्ये लावलेल्या रोपांना नोव्हेंबरमध्ये फुले आली.

पाच टन फुलांचे उत्पन्नअजय राऊत यांनी रोज एक क्विंटल शेवंतीचे फुले तोडून ती ४० रुपये किलो प्रमाणे जालना व छत्रपती संभाजीनगर शहरात पाठवली. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. दोन महिन्यांत पाच टन फुलांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. फुले विक्रीतून त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० हजार रुपये खर्च वजा करता दोन लाखांचा निवळ नफा फूलशेतीतून अजय राऊत यांना मिळाला आहे.

स्वत:ची शेती समृद्ध करादुष्काळ, अवकाळी पाऊस, त्यात पारंपरिक शेती यामुळे यातून कमी उत्पन्न मिळत असल्याने मोठ्या कठीण परिस्थितीत संसाराचा गाडा हाकावा लागत होता. कमी खर्च व कमी क्षेत्रात फूलशेती करण्याचा निर्णय घेतला. फूलशेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता दैनंदिन उत्पन्न होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगले उत्पन्न मिळविणे शक्य आहे.- अजय राऊत, फूल उत्पादक, सौंदलगाव.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र