शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक कामांची मर्यादा अखेर ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:10 IST

Jalana News: केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) वैयक्तिक कामांवरील आर्थिक मर्यादा २ लाखांवरून वाढवून थेट ७ लाख रुपये केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच नरेगा सॉफ्टवेअरमध्ये हे नवीन पोर्टल लागू होणार आहे.

- गणेश पंडित केदारखेडा (जि. जालना) - केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) वैयक्तिक कामांवरील आर्थिक मर्यादा २ लाखांवरून वाढवून थेट ७ लाख रुपये केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच नरेगा सॉफ्टवेअरमध्ये हे नवीन पोर्टल लागू होणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने ३ नोव्हेंबर रोजी ‘रोहयोतील अडथळ्यांमुळे शेतकरी सापडला संकटात’ आणि ९ नोव्हेंबर रोजी ‘मनरेगा योजनेतील दोन लाखांची मर्यादा, राज्यात १० लाख ८९ हजार कामांवर गंडांतर’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यांची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील विहिरी, शेततळे व जमीन विकास आदी कामांवर केंद्र सरकारने दोन लाखांची मर्यादा घातली होती.

११ लाख कामांना अडथळा२ लाखांच्या मर्यादेमुळे २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांतील सुमारे १,७५,६९२ शेतकऱ्यांच्या १० लाख ८९ हजार कामांवर प्रशासकीय अडथळा निर्माण झाला होता. राज्य सरकार विहिरीसाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देत असताना केंद्राच्या दोन लाखाच्या मर्यादेमुळे कामे प्रलंबित राहिली होती.

ही मर्यादा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी लागू होती. राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार आता ७ लाख मर्यादेपर्यंतची मंजुरी मिळाली असून, ही नवीन मर्यादा लवकरच नरेगा सॉफ्टवेअरमध्ये लागू होणार आहे.- डॉ. भरत बास्टेवाड, राज्य आयुक्त, मनरेगा, नागपूर.

मनरेगा कामांची मर्यादा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रशासन वारंवार अडथळे निर्माण करते. या अन्यायकारक निर्णयांविरोधात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत.- नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता.

ग्रामीण विकास मंत्रालयाने घेतली तातडीने दखलरोहयो राज्य आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी ३० सप्टेंबर रोजी राज्य सचिवांना प्रस्ताव पाठवून ही मर्यादा सात लाखांपर्यंत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्याने केंद्राकडे शिफारस केली होती. त्यानुसार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ८ नोव्हेंबर रोजी ही मर्यादा हटवून सात लाख रुपयांपर्यंत मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ५.६९ लाख प्रगतिपथावरील कामांना गती मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MGNREGA individual work limit increased to ₹7 lakh, relief for farmers.

Web Summary : The central government raised MGNREGA individual work limits to ₹7 lakh, benefiting farmers. Lokmat's reports highlighted the previous ₹2 lakh limit's obstacles. The new limit will soon be implemented in the NREGA software, boosting ongoing projects.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना