शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:35 IST

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे मोर्चा; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

- पवन पवारवडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या उपसमितीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मराठा समाजाला 'येड्यात काढू नये', असे सुनावत, ही समिती म्हणजे 'जुनेच खुळ' असून 'फक्त खांदे बदलले पोळ्याच्या दिवशी', असा टोला त्यांनी लगावला आहे.

अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. 'आमचं म्हणणं सरकारच्या डोक्यात येत नाही, सरकार किडे पडल्यासारखं वागायला लागलं आहे,' असा संताप त्यांनी व्यक्त केला.

'या' मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी कराजरांगे पाटील यांनी सरकारने तातडीने काही महत्त्वाच्या मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.- मराठा-कुणबी एक आहे, असा जीआर काढावा.- यासाठी तातडीने कॅबिनेट बैठका घ्या.- केसेस मागे घ्या आणि शहीद झालेल्या कुटुंबांना मदत द्या.- 'सगे सोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करा.- हैदराबाद व सातारा संस्थानांच्या गॅझेटसाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवा.

मुंबईकडे मोर्चा काढण्याचा इशारासरकारने जर आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही मुंबईला येऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 'तुम्ही दिशाभूल करणारे काम करू नका, मराठ्यांना येड्यात काढायचे बंद करा,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

उपसमिती जुनीचजरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उपसमिती स्थापन करणे आणि त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'उपसमिती तर पूर्वीच होती, फक्त आता दुसरे कोणीतरी अध्यक्ष झाले आहे,याला आमच्याकडे खांदे बदल म्हणतात' असे म्हणत त्यांनी सरकारची कृती निव्वळ पोकळ असल्याचे सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना