शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:52 IST

दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा देखील भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला

जालना : आम्ही दोन ते तीन दिवसच विरोधी पक्षात असून, लवकरच राज्यात आम्ही सरकार आणू, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले. तसेच शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी मिळत नसल्याने त्यांनी बंड केले, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला. जालना शहरात कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासनाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी दानवे बोलत होते. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमची युती होती. त्याचवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले होते. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु, निवडणूक झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेली. त्यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार चांगले चालायला पाहिजे होते. परंतु, आता शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याने ४० आमदारांनी बंड केले आहे. यात भाजपचा कुठलाही संबंध नाही. आम्ही वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात अद्याप कुठलीही बैठक झालेली नाही. फडणवीस हे मुंबईत असून, सांयकाळी ते बैठकीसाठी दिल्लीलाही जाणार असल्याचे सांगून आम्हाला शिंदे गटाचा प्रस्ताव अद्याप आला नाही. आल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असे राज्यमंत्री दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिंदे -फडणवीस यांची भेट नाहीएकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही, असे सांगत दानवेंनी अधिक भाष्य करणे टाळले.

टॅग्स :JalanaजालनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेraosaheb danveरावसाहेब दानवेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ