शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार आडमुठं, आम्ही नाही"; मागण्या मान्य करूनच मुंबई सोडणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:04 IST

"२७ ऑगस्टला अंतरवालीहून मुंबईकडे कूच; २९ ला आझाद मैदानावर आरक्षणाची लढाई"

वडीगोद्री ( जालना): मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण बेमुदत सुरू करणार, अशी जाहीर घोषणा करत त्यांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर मुंबईत उतरायचे आवाहन केले. तसेच मराठा-कुणबी एकच असल्याने आरक्षणाशिवाय मुंबईतून मागे हटणार नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला.ते आंतरवली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

जरांगे पाटील म्हणाले, "२७ ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघून २८ रोजी शिवनेरी किल्ला आणि पवित्र मातीतून प्रेरणा घेऊन आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत. सरकारने २६ तारखेपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही थेट आझाद मैदानावर उपोषणाला बसू."

नेमक्या मागण्या मांडताना त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, 

- मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्याबाबत जीआर काढला तरी सरकार आडमुठेपणा करत आहे.

- हैद्राबाद गॅझेट लागू करावे, केवळ अभ्यास सांगून वेळ मारून नेता कामा नाही.

- खोटे गुन्हे मागे घ्यावेत, बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना मदत व नोकऱ्या द्याव्यात.

- सगे सोयरेची अधिसूचना तातडीने अंमलात आणावी, दोन वर्षे वेळ दिला तरी सरकार टाळाटाळ करत आहे.

मुंबईतून रिकाम्या हाताने जाणार नाही"सरकार आडमुठं आहे, आम्ही नाही. आरक्षण ही आमच्या जगण्याची लढाई आहे. मुंबईत आलो की परत रिकाम्या हाताने जाणार नाही. मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ," असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

भजनाच्या माध्यमातून होणार आंदोलन चळवळीला शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी "जाळपोळ नाही, दंगल नाही, फक्त संघटित लढा द्यायचा" अशी अट घातली आहे. मुंबईत किर्तन, पोवाडे आणि भजनाच्या माध्यमातून आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

... तर मराठा समाज इतिहास घडवेल"२९ ऑगस्टला आरक्षण घेऊनच उठणार. सरकारने अंमलबजावणी केली नाही, तर मराठा समाज इतिहास घडवेल," असे ठाम वक्तव्य करून जरांगे यांनी राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा नवीन आव्हानं उभे केले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण