शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:45 IST

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण...

आजपासून पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. गेल्या २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते कायद्यात टिकायला हवे. यासाठी एक महिन्याची वेळ द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपले उपोषण सोडवले होते. सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच, यापूर्वीही १७ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. मात्र, या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता, पण...मनोज जरांगे म्हणाले, या गोर गरीब लेकरांसाठी आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीने कठोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, आमच्या गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन कुणाकडूनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार आम्हाला आमच्या हक्काचं, ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हे उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे -मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकार