शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'कॅफे'मध्ये अत्याचार, गर्भपातासाठी तरुणीस हॉस्पिटलमध्ये सोडून तरुण फरार

By दिपक ढोले  | Updated: August 22, 2023 16:28 IST

तरुण फरार झाल्याने तरुणीने शेवटी आई-वडिलांना बोलावून घेतले; या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जालना : सदर बाजार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच शहरातील आझाद मैदानाजवळील थिंकिंग कॅफे शॉपमध्ये छापा टाकून चार जोडप्यांना पकडले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर याच कॅफे शाॅपमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. याप्रकरणी संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना शहरातील १९ वर्षीय तरुणी एका कोचिंग क्लासमध्ये अकाउंटंट म्हणून काम पाहते. सदर तरुणीच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असलेला संशयित आरोपी हा तिच्या वडिलांच्या मजूर सप्लायच्या व्यवसायात मदत करण्यासाठी कामाला होता. सदर तरुणीच्या वडिलांनी लावलेला फोन उचलत नसल्याने त्यांनी आपल्या मुलीच्या मोबाइलवरून सोहेल यास फोन लावला होता. तरुणीचा मोबाइल नंबर मिळाल्याने त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले होते. 

सदर तरुणीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर त्याने आझाद मैदानजवळ असलेल्या थिंकिंग कॅफे शॉपमध्ये नेऊन अत्याचार केला. सदर तरुणीला गर्भधारणा झाली, ही बाब तिने त्याला सांगितली. त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या परस्पर आणून दिल्या होत्या. या गोळ्यानेही गर्भपात न झाल्याने पुन्हा त्याने तिला तीन वेळा गर्भपात होण्याच्या गोळ्या दिल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेतल्यामुळे सदर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन, तिची प्रकृती बिघडली होती. तिला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व तिथून तो गायब झाला. 

घाबरलेल्या तरुणीने आपल्या आई - वडिलांना फोन करून रुग्णालयात बोलावून घेतले. रुग्णालयात तरुणीवर उपचार केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा तिने सदर बाजार ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंक मोबाइल पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक इंगेवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना