शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:47 IST

धक्कादायक म्हणजे, लग्नातील तरुणीचे आई, मामा हे बनावट होते. तसेच तिला पूर्वीच्या लग्नातून दोन मुली आहेत.

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना): तालुक्यातील सोयगाव देवी येथील तरुणाला दोन लाख रुपये घेऊन विवाह लावला, दहा दिवस संसार केला व नंतर परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नववधूला भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाह करणारी महिला चक्क दोन मुलींची आई असल्याचा प्रकारही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे.

तालुक्यातील सोयगाव देवी येथील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे ( 25)  हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत आहे. नातेवाईकाने रमेश शेळके याच्या मध्यस्थीने रावसाहेबच्या लग्नासाठी एक मुलगी पहिली. रमेशने सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते. तिला २ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक यास तयार झाले. 

त्यानंतर, २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्या सोबत झाला. यावेळी मुलीची आई, मामा, रमेश शेळके, त्याची पत्नी, त्याचा आळंद येथे राहणारा भाऊ, गजू,आशाबाई यांची उपस्थिती होती. लग्नानंतर त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले. रावसाहेब आणि नातेवाईक त्यानंतर नववधूसह सोयगाव देवी येथे आले. गावातील भाऊबनदांच्या उपस्थितीत पुन्हा 25 जून रोजी देविदास बाबा यांच्या मठावर सोनी वानखडे व रावसाहेब यांचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला. यावेळी गाव जेवण देण्यात आले. 

दरम्यान, सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे असे सांगितले. ६ जुलै रोजी भोकरदन बसस्टँडवर रावसाहेब सोनीला घेऊन आला. तेव्हा तिथे तिचा प्रियकर होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रावसाहेबने पोलीस स्टेशन गाठले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सोनीने सपोनि रत्नदीप जोगदंड, सपोनि राजाराम तडवी यांनी कसून चौकशी केली असता पैसे घेऊन लग्न करत फसवणूक केल्याची कबुली दिली. रावसाहेब सहाणेच्या तक्रारीवरून सोनी वानखडे हिच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी वानखडे हिला अटक करण्यात आली आहे.

सोनी आहे दोन मुलींची आई धक्कादायक म्हणजे, लग्नातील आई, मामा हे बनावट होते. तसेच सोनी वानखेडेचा पूर्वी विवाह झाला आहे. तिला दोन मुली आहेत. तिचे माहेर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव असून पहिल्या पतीला हा प्रकार माहिती नसल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना