शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 14:08 IST

TET Exam Racket :टीईटी पेपर फुटी प्रकरणाची माहिती देताना एजंटने सांगितलेल्या नावावरून जालना जिल्ह्यात तपास

जालना : राज्यात गाजत असलेल्या टीईटी पेपर ( TET Exam Racket ) फुटी प्रकरणी एका एजंटची व्हायरल झालेल्या एका ऑडीओ क्लिपवरून पुणे गुन्हे शाखेच्या ( Pune Crime Branch ) एका पथकाने जालना जिल्ह्यात आज सकाळपासून छापासत्र सुरु केले आहे. गुन्हे शाखेचे एक पथक वाटूर येथे ऑडिओ क्लिपमध्ये नाव आलेले प्रा. सुनील कायंदे यांच्या घरी तपास करत आहे. तसेच एक पथक शहरात देखील तपास करत असल्याची माहिती आहे.

आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) ( MHADA Paper leak ) भरती परीक्षेतील पेपरफुटी उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आता शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) पेपरफुटी ( TET Exam Racket) उघडकीस आणली आहे. जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याला म्हाडा पेपरफुटी प्रकरणात अटक केल्यावर त्याची घरझडती घेण्यात आली. त्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील हॉल तिकिटे तसेच उमेदवारांची नावे असलेली यादी सापडली होती.

यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही याप्रकरणी अटक झाली आहे. यानंतर एका वृत्तवाहिनीने पेपर फुटी प्रकरणाची माहिती एक एजंट देत असल्याची ऑडीओ क्लीप ऐकवली. यात एजंटने टीईटी पेपरमध्ये कशाप्रकारे पैसे घेऊन पास करण्यात येते हे सांगितले. दरम्यान या एजंटने जालना जिल्ह्यातील प्रा. सुनील कायंदे यांचे नाव घेत त्यांनी टीईटी पास होण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले. यावरून पुणे येथील गुन्हे शाखेच्या एका पथकाने आज वाटूर येथील प्रा. कायंदे यांच्या घरी छापा टाकला आहे. तसेच गुन्हे शाखेचे एक पथक जालना शहरातील शकुंतला नगर परिसरात देखील तपास करत असल्याची माहिती आहे.

आरोपात तथ्य नाहीमुलावर केलेले आरोप बिन बुडाचे आहेत. हमाझा मुलगा एक चांगला शिक्षक आहे. त्याने काही गैरकृत्य केलेले नाही. - अर्जुन कायंदे, वाटुर

हेही वाचा - TET Exam Racket: 'पात्र शिक्षक' होण्यासाठी द्यावे लागत होते दीड ते तीन लाख ! 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाexamपरीक्षाEducationशिक्षण