या पत्राच्या उत्तरासह जिल्हाधिकारी हे स्थानिक आपत्ती निवारण केंद्राचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्याकडे या पत्रांचा तपशील एकत्रित करून पाठविण्यात येणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यावरच जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीदेखील ऑनलाइन वर्ग घेण्याचे काम केले आहे. परंतु इंटरनेट आणि ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे ते संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने आता साधारणपणे मुलांमध्ये एक प्रकारची उदासीनता आली आहे. ती दूर करण्यासह त्यांच्यात पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी कोरोनाचे उच्चाटन महत्त्वाचे ठरणार आहे.
मानसिकेतत बदल आवश्यक
जोपर्यंत मुले शाळेतील मैदानावर अथवा वर्गात येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यातील उत्साह जागृत होत नाही. कोरोनामुळे ऑलनाइन वर्ग सुरू असले तरी त्यात पाहिजे ती एकाग्रता होत नाही. त्यातच एक ते दाेन तास शिक्षण झाल्यावर मुलांना कोरोना कारणाने घरात थांबावे लागते. त्यातून मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळण्यातच मुलांचा वेळ जात असून, त्यातून मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.