शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:27 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते.

जालना : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येला २१ एप्रिल रोजी सायंकाळी ‘आप काश्मिरी हो क्या? हिंदू हो क्या? आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न विचारत दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा जालना येथील आदर्श राऊत याने बुधवारी केला आहे. दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर स्वत:सोबत घडलेल्या घटनेची माहिती ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तेथे चालत किंवा घोडा घेऊन जावे लागते. त्यामुळे आदर्श याने घोडा घेऊन वर जाणे पसंत केले. ते मॅगी स्टॉलवर थांबले  असता पाच-सहा जण त्यांच्याकडे आले.

आप यहाँ के नही लगते? यावर आदर्श म्हणाला...

‘आप काश्मिरी हो क्या, आप हिंदू हो क्या, आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न त्यांनी केले. त्यावर आदर्श याने ‘नही, मैं यहाँ का ही हूँ...’ असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्ती ‘आज भीड कम है’ असे म्हणत तेथून निघून गेल्या. त्यानंतर आदर्श राऊत हा हॉटेलमध्ये गेला.

दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला सकाळी ते  श्रीनगरमध्ये गेले. त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली. सर्व पर्यटक भयभीत झाले. 

२१ ला करायचा होता हल्ला

घटनेनंतर दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले. त्यातील एकाने आपल्याशी संवाद साधल्याचे आदर्शने वडिलांना सांगितले. दहशतवाद्यांनी केलेली विचारणा पाहता त्यांना २१ एप्रिलला हल्ला करावयाचा होता; गर्दी कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केल्याचे दिसते.

वडिलांशी चर्चा केल्यानंतर आदर्श याने ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे माहिती दिली. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर २६ रोजी श्रीनगरहून मुंबई येथे आणि तेथून रेल्वेने जालन्यात आल्याचेही आदर्श राऊत म्हणाला.

‘सीआयडी’ने केला संपर्क

राऊत याने ई-मेल केला असला तरी अद्याप एनआयएकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही. परंतु ही माहिती मिळताच बुधवारी सीआयडीच्या पथकाने आदर्श राऊत याच्याशी संपर्क साधून चौकशी केली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला