शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दहावा संशयित रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:27 PM

जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे.

जालना : जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. तर शुक्रवारी दाखल झालेल्या सहा रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळ येथून आलेल्या ३० जणांना त्यांच्या घरातच निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता जालना जिल्ह्यातून इतर शहरासह इतर राज्य, विदेशातून परत येणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा उपाय म्हणून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. त्या शारीरिक त्रास असलेल्या रूग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. जालना जिल्हा रूग्णालयात शनिवारी २१ मार्च रोजी दुपारपर्यंत १० जणांना कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल तिघांच्या स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी सहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. संबंधितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाला आहे. त्याचेही स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल