शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात टेम्पो उलटून २५ व-हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:39 IST

जाफराबाद तालुक्यातील पापळ या गावात लग्न लावून व-हाडी टेम्पो घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पो पलटी झाल्याने पंचवीस जण जखमी झाल्याची घटना नाव्हा रस्त्यावरील दत्त आश्रमाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जाफराबाद तालुक्यातील पापळ या गावात लग्न लावून व-हाडी टेम्पो घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पो पलटी झाल्याने पंचवीस जण जखमी झाल्याची घटना नाव्हा रस्त्यावरील दत्त आश्रमाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.या अपघातात रामकुंवर बरडे (६०, रा. रवना परंडा ), मंगल वाघ (३६, रवना पवना परंडा), रानुबाई बरडे, (६५, रा. हिवडी, ता.जि. जालना), पंचकुला बरडे (३५, हिवडी, ता. जि. जालना ), कविता (१९), उत्तम बरडे (७०), मंगल गांगुर्डे (४०, रा. रवना), रामा बरडे (२५, रा. हिवर्डी), कुंतला बरडे (२३), भिवसन वाघ (७५), सुभाष गोरे (६०), आशाबाई गोरे (६०), विश्वनाथ वाघ (१०), अनिता गांगुर्डे (३५), पार्वती गांगुर्डे (४०), पार्वर्ती पवार (६५), प्रिया वाघ, प्रतीक्षा गांगुर्डे, चंद्रकला गोरे, सुहास गांगुर्डे, सुभाष बरडे यासह आदी जखमी झाले आहेत.पापळ या गावात राम वाघ यांचे लग्न लागल्यानंतर हे वºहाड घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे टेम्पोने परत जात होते. जालना शहराजवळील दत्त आश्रमजवळ आल्यावर पाठीमागून येणाºया ट्रेलर (क्रं.एमएच. ०४. २०३३) ने टेम्पो (क्रं.एमएच.२४. एफ.५७९२) ला जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पो हा रस्त्याच्या कडेला गेल्याने पलटी झाला. रस्त्याच्या कडेला टेम्पो पलटी झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन जखमींना मदत केली. या टेम्पोत महिला व लहान मुलांचा समावेश होता. यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.ट्रेलर चालक फरारही घटना घडताच ट्रेलर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.तीन जण गंभीरया अपघातात २५ जण जखमी झाले असून, यातील तीन जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एकास रात्री उशीरा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हालविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.महिला व मुलांचा समावेशलग्न लागल्यानंतर सर्व महिला व मुलांना एका टेम्पोत बसविण्यात आले. याच टेम्पोला अपघात झाल्याने यात महिला व मुले जखमी झाले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात