शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आतापासूनच टँकरचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:34 IST

भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलसंकटाच्या भीतीने ग्रामस्थांत चिंंता पसरली आहे. सर्वसामान्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, बाणेगाव, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, लोणगाव, पळसखेडा ठोंबरी, चिंचोली निपाणी, खामखेडा इ. पंधरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच राजूरला दर्शनासाठी येणाऱ्या भावि कांची तहान भागविली जाते. परंंंतु यावर्षी एकही जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतक-यांची खरीप हंगामातील पिके वाया गेली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी समस्येचे सावट उभे राहिले आहे. राजूरसाठी नव्याने टंचाईग्रस्त योजनेअंतर्गत बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सध्या पावसाळा असूनही प्रभागनिहाय चार दिवसांआड राजूरकरांना पाणी मिळत आहे. पावसाळ्यात चार दिवसानंतर पाणी मिळत असताना संभाव्य हिवाळा, उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील, याची चिंंता ग्रामस्थांना सतावत आहे. सध्या राजूरकरांची तहान खाजगी टँकरवर सर्वाधिक भागवली जात आहे. पाणी समस्येची तीव्रता आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन खाजगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनता आर्थिक कोेंडीत सापडली आहे. येथे बहुतांश नागरिक मोल मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागवतात परंतु त्यांना निम्मी मजुरी पाण्यासाठी खर्चावी लागत असल्याने नागरिकांत संताप आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची वाट लागल्याने मजुरांना रोजगार मिळणे अवघड होऊन बसले आहे. चांधई एक्को प्रकल्पात २० ते २५ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाची पाळू उघडी आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता बघता जोत्याखाली असलेली पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीत घटली आहे.तसेच होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईmonsoon 2018मान्सून 2018