शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘एसडीएम’कडे टँकरचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:42 IST

शासनाने आता टँकर सुरू करण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याने टंचाईवर लवकर मात करणे शक्य होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्यासाठीचा प्रत्येक प्रस्ताव हा पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी जात होता. परंतु यामुळे टँकर सुरू होण्यास बराच उशीर होत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता टँकर सुरू करण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याने यातून टंचाईवर लवकर मात करणे शक्य होणार आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास बहुतांश गावात यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यातच जाणवत आहेत. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात ६५ पेक्षा अधिक टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड तसेच परतूर येथे महसूलचे चार उपविभागीय अधिकारी आहेत. आता ज्या गावात टँकर सुरू करायचे आहेत, तेथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तो प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठवायचे आहे. हे प्रस्ताव आल्यानंतर साधारणपणे तीन दिवसात टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तहसील दारांनाही टँकरचे अधिकार दिले होते.जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया एजन्सीला टँकर लावताना त्यावर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, हे केवळ टेंडरमध्येच असते. प्रत्यक्षात जीपीएस प्रणाली कार्यान्वित नसल्याचे दिसून आले.जालना : टँंकरची संख्या २०० वर जाणारजालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. हे लक्षात घेऊन प्रशासनाने ११ कोटी रूपयांचा पाणीपुरवठा आराखडा तयार केला आहे. त्याला मंजुरी दिली असून, त्यातून मागेल तेथे टँकर देण्यात येणार आहेत. यंदा टँकर २०० वर जातील.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईGovernmentसरकारdroughtदुष्काळ