शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

By दिपक ढोले  | Updated: March 21, 2023 17:44 IST

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अंबड शहरातील यशवंतनगर येथील घटना

जालना : तोंडाला रूमाल बांधून आलेल्या सहा दरोडेखोरांनी तलाठ्याला मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख तीन हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना अंबड शहरातील यशवंतनगर येथे सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. यात तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावशे (३७) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ईश्वरदास पावशे हे पत्नी व एका मुलीसोबत अंबड येथील यशवंतनगरात राहतात. सोमवारी ते झोपी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी हातात काठ्या घेऊन पावशे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले. त्याचवेळी ईश्वरदास पावशे यांना जाग आली. त्यांनी कोण आहे रे असे म्हणताच दरोडेखोरांनी काठीने त्यांना मारहाण केली. डोक्यात व डाव्या पायावर काठीने मारून जखमी केले. त्यांच्या पत्नीला व मुलीला धाक दाखवून शांत राहण्यास सांगितले. नंतर कपाटाचे लोक तोडून चार लाख ५० हजार रोख व ५० हजारांचे सोन्याचे नेकलेस, ५० हजारांची पोत, २५ हजारांचे सोन्याचे झुंबर, २० हजारांची सोन्याची पोत व आठ हजारांचे डोरले आणि चांदीचे चैन असा एकूण सहा लाख तीन हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी ईश्वरदास पावशे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना