शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरत्या प्रमाणपत्रावर निधी लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:37 IST

जालना जिल्हा परिषदेला राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करताना ते प्रोव्हिजनल युसी असे सादर करून निधी उचलत असल्याचे दिसून आले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेला राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करताना ते प्रोव्हिजनल युसी असे सादर करून निधी उचलत असल्याचे दिसून आले.आज जालना जिल्हा परिषदेकडे लाखो रूपयांचा निधी खर्चा अभावी पडून आहे. हा निधी नेमका कोणत्या कारणामुळे पडून आहे, याबद्दल ना यंत्रणा स्पष्ट करत आहे, ना सत्ताधारी मंडळीकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवायचा झाल्यास त्यांना आधी दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्या शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाही.हे प्रमाणपत्र सादर करताना ते तात्पुरत्या स्वरूपाचे देऊन निधी उचललण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.ही बाब दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराचे देयक देण्याच्या कारणावरून वित्त विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.जालना जिल्हा परिषदेतील अखर्चिक निधीच्या मुद्यावरून अनेक विभागांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात कोणत्या विभागाचा किती निधी शिल्लक आहे, याची माहिती विचारली असता ती कोणीही देण्यास तयार नाही. परंतु निधी मिळण्यासाठी प्रोव्हिजनल युसीची शक्कल लढविली जात आहे.जालना : अखर्चित निधीमुळे विकास कामांवर परिणामजालना जिल्हा परिषदेत सत्ता ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची आहे. या जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेने सोबत युती करून भाजपला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हवे होते. परंतु भाजपचे हे मनसुबे शिवसेनेने उधळून लावून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत हातमिळवणी केली. तेव्हापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यातून जिल्हा परिषदेत विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकास निधी मिळण्यासह तो खर्च करतानाही अनेक तांत्रिक बाबींच्या अडचणी येत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधी