शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

काय न्यायचेय ते न्या; परंतु मारू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:22 IST

मला मारू नका, हवे ते घेऊन जा अशी आर्तविनवणी मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर यांनी चोरट्यांना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरवाजा नॉक करून दोन जण अचानक घरात घुसले, घरात मी एकटा होतो, दार उघडल्या उघडल्या दोन जणांनी माझ्या गळ्याला चाकू लावला आणि काय आहे ते लवकर दे नसता जिवे मारू अशी धमकी दिली. मला मारू नका, हवे ते घेऊन जा अशी आर्तविनवणी मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर यांनी चोरट्यांना केली.भाग्येश भार्डीकर हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरात बसले होते. त्याचवेळी दोन जणांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम तसेच भार्डीकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबविली.ही घटना घडल्यानंतर भार्डीकर यांनी आरडाओरड केली परंतु, कोणी येण्याच्या आत चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पळून जात असतांना त्यांचा एक मोबाईल आणि एक चाकू तेथेच सोडून ते चोरटे पसार झाले.या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्री कदिम जालना पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. भार्डीकर यांच्या मुलाचे लग्न असल्याने दागदागिन्यांची खरेदी आणि रोख रक्कम घरात होती. जवळपास ३० हजार रूपये रोख आणि दागिने लंपास केले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस