शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई दूर करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:37 IST

लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : शहरवासियांना आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे नियोजन

जालना : जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे सवोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वॉल्व्ह दुरुस्ती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.जालना शहरातील नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र घाणेवाडी जलाशयाने तळ गाठल्यामुळे या जलाशयातून नवीन जालना भागाला केला जाणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी- जालना या पाणी पुरवठा योजनेव्दारेच पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या योजनेवरील वॉल्व्ह विविध ठिकाणी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. शिवाय काही ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आपण स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर पाचोड ते दावरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरु असलेली पाणी चोरी रोखण्यात यश आले आहे. अंबड येथील २४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला मागील काही दिवसापर्यंत केवळ सहा एमएलडीच पाणी पुरवठा होत होता. आता जवळपास पंधरा ते सोळा एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून अंबड जलशुध्दीकरण केंद्रात बंद अवस्थेत असलेले पंधरा एमएलडी क्षमतेचे दुसरे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर जालना शहराला जायकवाडी- जालना या योजनेव्दारे जवळपास ३५ ते ४० एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जालना शहरवासियांना आठ आठवाड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater shortageपाणीटंचाई