शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! जालन्यात २६ तलाठी, १७ कृषी सहायकांसह ३१ ग्रामसेवकांचे होणार निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:14 IST

आपत्ती अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालातून उघड; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना : शासनाकडून २०२२ पासून वितरीत करण्यात आलेल्या आपत्ती नुकसान अनुदान वाटपात जालना जिल्ह्यात अंबड व घनसावंगी तालुक्यात घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालात उघड झाले आहे. घोटाळ्याच्या चौकशी समितीकडून अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार, ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा अपहार झालेला असून, या घोटाळ्याप्रकरणी २६ तलाठ्यांचे निलंबन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज (दि. १०) पत्रकार परिषदेत दिली. या घोटाळ्याची रक्कम घोटाळेबाजांकडून सक्तीने वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यामध्ये १७ कृषी सहायक व ३१ ग्रामसेवकांचा देखील समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना डॉ. पांचाळ पुढे म्हणाले की, २०२२ पासून आपत्तीच्या नुकसानीपोटी देण्यात आलेल्या अनुदानात अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. यानुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. अंतिम अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक व शेतकरी यांची चौकशी केल्यानंतर हा घोटाळा ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा झाला असल्याचे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. अनुदान घोटाळ्यात सहभागी असलेल्या तलाठ्यांनी ५ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यात अंबड तालुक्यातून ३ कोटी २० लाख रुपये, तर घनसावंगी तालुक्यातून २ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. अंबड तालुक्यात १५ कोटी ९३ लाख १२ हजार २२५ रुपयांचा, तर घनसावंगी तालुक्यात १९ कोटी ३ लाख ९१ हजार १०९ रुपयांचा अनुदान घोटाळा झाला आहे.

९ तलाठ्यांनी केला १ कोटीचा घोळअनुदान घोटाळा प्रकरणाची चौकशी समितीने चौकशी केली असता, ९ तलाठ्यांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांच्यावर घोळ केला असल्याचे उघड झाले आहे. या तलाठ्यांनी अद्याप रकमेचा भरणा न करता खुलासाही सादर केलेला नाही. अनुदान घोटाळा प्रकरणी अंबड तालुक्यातील १५, तर घनसावंगी तालुक्यातील १६ तलाठी चौकशीअंती दोषी आढळले आहेत. तसेच दोन्ही तालुक्यांतील १७ कृषी सहायक व ३१ ग्रामसेवक देखील घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

दोषींवर कारवाई होणारघोटाळ्यामध्ये दोषी आढळलेले तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना ४८ तासांत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा सादर न केल्यास या २६ तलाठ्यांसह ग्रामसेवक, कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भोकरदन, परतूर, जाफराबाद, जालना, मंठा व बदनापूर या सहा तालुक्यांतील अनुदान वाटपाची चौकशी सुरू आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांकडून अनुदानाची रक्कम वसूल करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग