शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुरक्षा मंत्र’ विद्यार्थ्यांसह महिला, नागरिकांसाठीही उपयुक्तच: वीरेंद्र मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:25 IST

जालना पोलिसांचे पुस्तक हिंदी-इंग्रजी भाषेतही यावे

जालना :जालनापोलिस दलाच्या वतीने महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले ‘सुरक्षा मंत्र’ हे पुस्तक सर्वांसाठीच उपयुक्त आहे. यातील माहिती पाहता आता हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत व्हावे, जेणेकरून देशपातळीवर याचा उपयोग करता येईल. शिवाय हे पुस्तक वेबसाईटवरही प्रसिद्ध करावे, जेणेकरून सर्व समाज घटकाला यातील माहितीचा लाभ होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला.

जालना पोलिस दलाच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे विमोचन गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जेईएसचे प्राचार्य डॉ. अग्निहोत्री, उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दामिनी पथकातील महिला अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुस्तक तयार करण्यासाठी योगदान देणारे, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे संजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर डीवायएसपी करिश्मा चौधरी यांनी आभार मानले. यावेळी विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.चौकट

घाबरू नका, तक्रार करा : बन्सलशालेय मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान व्हावे, वाहतूक नियम, सायबर क्राईमची माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. कोणतीही अप्रिय घटना घडली तर मुलींनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करावी. त्या तक्रारीनुसार आरोपीला पोलिसांकडून चोप दिला जाईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला.

समाज घटकाचे मोठे योगदान : नोपाणीपोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ट्विन्स उपक्रमात शिक्षकांना कायद्याचे ज्ञान देण्यात आले असून, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. त्यापुढील पाऊल म्हणून सुरक्षा मंत्र हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचा नक्कीच लाभ महिला, मुलींसह समाज घटकाला होणार आहे. त्यावर देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या क्युआर कोडमुळे उपयुक्त माहितीही सर्वांना मिळणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस