शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणासाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत अंबड, घनसावंगी व गेवराई तालुक्यातील ६७ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत.सर्व धर्माच्या मुलांना आपलं जीवन सुसंस्कारीत घडविता यावे, यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी, या हेतूने अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवामंडळ गुरूवकुंज आश्रम (जिल्हा, अमरावती) अंतर्गत येथे श्री. गुरूदेव सेवाश्रमाची स्थापना सन १९६३ मध्ये करण्यात आली होती.भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पाचलेंगावकर महाराज अशा अनेक थोर मंडळींनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत. या आश्रमामधील मुलांची नियमित सकाळी ध्यान साधना करणे, सूर्य नमस्कार, सामुदायिक प्रार्थना, योगासने, मल्लखांब अशी दिनचर्या ठरलेली आहे.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची मान्यता ५२ विद्यार्थ्यांची आहे. पण, सद्या स्थितीत दुष्काळी परिस्थितीमुळे येथे ६७ विद्यार्थी रहात आहेत. यात गरजूवंत, शेतकरी, अनाथ आदी मुलांचा समावेश आहे. याविद्यार्थ्यांना दररोज शिक्षण देण्यात येते.मात्र, ५५ वर्षांपूर्वी या आश्रमाचे बांधकाम करण्यात आले असल्याने यातील काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. सद्या स्थितीत खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक बजेट नसल्याने दानशूर व्यक्तींनी यास सढळ हाताने मदत करावी, तसेच या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. आश्रमाची दुरुवस्था झाल्याने याकडे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळात शेतक-यांच्या व अनाथ मुलांना राहण्याची सोय होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजEducationशिक्षण