शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:47 IST

देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : देशात आणि राज्यात भाजपा - शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.जालना लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची भोकरदन येथे शनिवारी सभा झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये अनेक गोंडस आश्वासने, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेमध्ये आले. मात्र, त्यानंतर केवळ पक्षामधील राजकीय नेत्यांनाच चांगले दिवस आले. सर्व सामान्य जनता, शेतकरी मात्र, भरडला गेला. त्यांच्या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. एकट्या मराठवाड्यात २०० शेतक-यांनी जीव गमावले. विदर्भातील एका शेतकºयाने आत्महत्येपूर्वी मोदी व फडणवीस यांचे नाव लिहून चिठ्ठी ठेवली. तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. या शेतक-याच्या घरी जाऊन मोदी व फडणवीस यांनी अच्छे दिन येतील म्हणून आश्वासन दिले होते़ या सरकारची ४३ कोटींची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.शहीद पोलीस अधिका-यांबाबत भाजपच्या उमेदवार साध्वीने केलेले वक्तव्य म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्याचा चव्हाण यांनी निषेध केला. विलास औताडे यांनी मोदी आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम यांची भाषणे झाली. माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ संतोष दसपुते, माजी आ़ धोडीराम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम जाणी, रामदास पालोदकर, बाबूराव कुळकर्णी, श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती़ महेश औटी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल देशमुख यांनी आभार मानले़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाAshok Chavanअशोक चव्हाण