शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

शंभर एकरावर होणार ऊस बेणे संशोधन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:16 AM

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यात वसंततदादा शुगर इन्स्टिुट्यूची उपशाखा अर्थात संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सहकारमहर्षी कै. अंकुशराव टोपे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अंकुशनगर येथील कार्यक्रमात २९१७ मध्ये अंकुशनगर येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्र उभारण्यासंदर्भातील घोषणा केली होती.परंतु तत्कालीन युती सरकारने त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली, परंतु प्रत्यक्षात जागा शंभर एकर जागा संपादनासाठीचा जीआर काढला नसल्याने ही केंद्र उभारणी लांबली. बुधवारी मुंबईत वसंतदादा शुगर इन्स्ट्यिूटची ४३ वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपूर्वी आ. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन या संशोधन केंद्रा बद्दल माहिती दिली होती. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यात वसंततदादा शुगर इन्स्टिुट्यूची उपशाखा अर्थात संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता जालन्यात या अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेची संशोधन शाखा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ. टोपे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.दरम्यान माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुशराव टोपे आणि माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ट संबंध होते. पवारांच्या मार्गदर्शनाखालीच टोपे यांनी त्यांची राजकीय वाटचाल केली. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर सहकार, शिक्षण, बँक तसेच सूतगिरणी, दोन साखर कारखाने त्यात समर्थ आणि सागर साखर कारखान्याचा समावेश होता. समर्थ कारखान्याने जालन्यात टोपे यांनी सहकारातील पहिला कारखाना सुरू केला होता. त्यानंतर टोपे यांनी माघे वळून कधीच पाहिले नाही.आजही आ. टोपे हे वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत. बुधवारी झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत ठाकरे यांनी या संदर्भातील घोषणा केल्याने आता जालना जिल्ह्यात ही शाखा स्थापन होणार आहे. या संदर्भात आ. टोपे म्हणाले की, येथे ऊसबेण्यांवर संशोधन होणार असून, अन्य साखर उद्योगांशी संदर्भातील घटकांवरही संशोधनासही मोठा वाव मिळणार आहे.आज कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या ऊसाचे वाण विकसित करण्यावर जगभर संशोधन सुरू आहे. येथे सुरू होणाºया या संशोधन केंद्रातही विविध प्रजातीच्या उसाच्या बेण्यावर संशोधन केले जाणारआहे. त्यामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रातील संशोधनाचा मोठा लाभ होणार असल्याचे टोपे म्हणाले.संशोधन : जालन्याचे नाव उंचावेलअंकुशरनगर येथे समर्थ साखरकारखाना परिसरात शासनाची शंभर एकर गायरान जमीन आहे. ही जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करून जागा मिळावी म्हणून आपण युती सरकारकडेही पाठपुरावा केला होता. परंतु या ना त्या कारणाने ते शक्य झाले नाही.परंतु आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अत्यंत महत्वाची संशोधन संस्था जालन्यात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आपण स्वागतच करतो. यामुळे शेतकºयांनाही मोठा लाभ होणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानChief Ministerमुख्यमंत्रीRajesh Topeराजेश टोपे