शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५०० पेक्षा अधिक वाहनांची ‘जीएसटी’कडून अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:58 IST

मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली. सोमवारी पहाटे २ वाजल्यापासूनच ‘जीएसटी’च्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून मुख्य मार्गाला लागणाºया चौकांमध्ये ट्रकची अचानक थांबवून तपासणी केली. यामध्ये चालकांकडे ‘ई-वे’ बिल आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना एक मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने प्राप्तीकर विभागासह जीएसटी विभागाचाही जालन्यावर नेहमीच करडी नजर असते. गेल्यावर्षी देखील ‘ई-वे’ बिलाअंतर्गत तपासणी केली असता एक कोटी रुपयांचा दंड व्यापारी आणि उद्योजकांना ठोठाविण्यात आला होता.तसेच मध्यंतरी वेगवेगळे व्यापारक्षेत्र निवडून त्यांच्यावर अचानक कारवाई केल्याच्या घटनाही नवीन नाहीत.सोमवारी पहाटेपासूनच औद्योगिक वसाहत तसेच जालन्याकडून औरंगाबादकडे आणि औरंगाबाद येथून जालन्याकडे येणा-या मालवाहतूक करणा-या ट्रकची ४० जणांच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये एक लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीचा माल वाहून नेला जात असेल तर त्या मालासोबत संबंधित ट्रक चालकाकडे ‘ई-वे’ बिल असणे अनिवार्य करण्यात आले आहे.परंतु, बहुतांश जणांकडे हे बिल आढळून आले नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.या संदर्भात राज्य कर उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. परंतु, नेमका किती वाहनांवर दंड आकारण्यात आला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत निश्चित झाले नसल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलाची ही तपासणी ही राज्यभर सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयraidधाडMIDCएमआयडीसीroad transportरस्ते वाहतूक