शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

By शिवाजी कदम | Updated: January 9, 2024 14:34 IST

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे.

- शेषराव वायाळपरतूर : यंदा निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांनी या कठीण काळातदेखील जिद्द न सोडता टरबूज अर्थात कलिंगड लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यंदा पाणी कमी असल्याने टरबुजास चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे.

परतूर तालुक्याला निम्न प्रकल्प हा सिंचन पिण्याचे पाणी व मासेमारांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच दरवर्षी होणारे मासेमार बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. धरणात मत्स्यबीज सोडून मासेमार बांधव आपली उपजीविका भागवितात. मात्र मागील वर्षी पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ १८.५९ टक्के जिवंत पाणी साठा राहिला आहे. धरणात पाणी नसल्याने मच्छीमारी व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. धरणात पाणी नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमारावरही होत असल्याने पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ यावर्षी त्यांच्यावर आली आहे.

कलिंगडाची लागवडही कमीचधरणात पाणी नसल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झालेला आहे. यामुळे पर्यायी रोजगार शोधण्यासाठी कलिंगड लागवडीकडे वळले आहेत.दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी कलिंगडाची लागवड यावर्षी पाणी नसल्याने घटली आहे. मात्र, लागवड घटल्याने दर चांगला मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

उपासमारीची वेळसध्या धरणात पाणी नसल्याने अहोरात्र पाण्यात फिरूनही मासे सापडत मिळत नाही. यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आमच्या समोर आहे. शासनाने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना मदत करावी.- तुकाराम बलिये, मच्छीमार.

पाणी नसल्याने सोसायटी अडचणीतमागील दोन वर्षांपासून आमची सोसायटी आर्थिक अडचणीत आली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने टाकलेले कोट्यवधीचे मत्स्यबीज वाहून गेले, तर यावर्षीही लाखो रुपयाचे टाकले आहे, मात्र धरणात पाणी नसल्याने हे बीजही वाया जाणार आहे. शासनाने या मच्छीमार सोसायटीस मदत करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा.- निवृती लिंबुरे. मच्छीमार सोयायटी, चेअरमन

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाfishermanमच्छीमार