जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय परतूर, जिल्हा परिषद शाळा मंठा, ग्रामीण रुग्णालय बदनापूर या ठिकाणी कोविन अॅपमध्ये लॉगीन पद्धतीने तर प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव, ग्रामीण रुग्णालय नेर, विवेकानंद हॉस्पिटल जालना, जिल्हा परिषद शाळा शहागड, मुलांचे शासकीय वसतिगृह भोकरदन, जिल्हा परिषद शाळा जाफराबाद तसेच देशमुख विद्यालय, घनसावंगी येथे स्वयंस्फूर्तीने ड्राय रन घेण्यात आला. या ड्राय रनमध्ये लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडण्यात आले. त्यानंतर कोविन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोविन अॅपमध्ये करण्यात आली. तसेच लसीकरणानंतर लाभार्थ्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण खोलीमध्ये ठेवण्यात आले. कोरोना लसीकरण प्रात्यक्षिक सत्रात हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जालना तालुक्यातील नेर येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाकोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जावळे, वैभव गोसावी आदींची उपस्थिती होती.
मंठा येथे अधिकाºयांची भेट
मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत ड्राय रन घेण्यात आला. यात २८ कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. नितीन पवार, गटविकास अधिकारी एम.डी. धस यांनी भेट दिली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र गायके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप चाटसे, तालुका आरोग्य सहायक दत्ता सरकटे, सुजित वाघमारे, जयश्री अंभुरे, अपर्णा उपाध्य, प्रतीक्षा वाघमारे, डॉ. जीवन मुरक्या, आशा स्वयंसेविका छाया जाधव, इंदिरा भावसार, रेणुका चव्हाण, शिक्षक संतोष विरकर, शिवाजी देशमुख, पोलीस कर्मचारी केशव चव्हाण आदींची उपस्थिती होती.
बदनापूर ग्रामीण रुग्णालयात रंगीत तालीम
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ड्राय रनला सुरूवात झाली. यात २४ कर्मचारी सहभागी झाले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोअंडले, डॉ. ढाकणे यांची उपस्थिती होती. यावेळी ड्राय रन करताना कुठलीही अडचण आली नसल्याचे डॉ. योगेश सोळुंके यांनी सांगिलते.
देऊळगाव राजा येथे २५ कर्मचा-यांचा सहभाग
देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रामा केअर सेंटरमध्ये ड्राय रन घेण्यात आला. यात २५ कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. यावेळी राजकीय तसेच पदाधिका-यांनी भेट दिल्या. यावेळी तहसीलदार डॉ. सारीका भगत, आरोग्य अधीक्षक डॉ. अस्मा शाहीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांच्यासह कर्मचा-यांची उपस्थिती होती.